Iqbal Singh Chahal Team Lokshahi
राजकारण

ईडीच्या समन्सनंतर आयुक्त इक्बाल सिंह चहल प्रतिक्रिया; म्हणाले, चौकशीत मी...

100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीनं नोटीस पाठवली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच गोंधळ सुरु झाला होता. ईडीने चहल यांना येत्या सोमवारी 16 जानेवारीला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरच आज आयुक्त चहल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ईडीच्या नोटीसवर बोलताना मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले की, ईडीच्या चौकशीत मी पूर्ण सहकार्य करेन, असे एका वाक्यात त्यांनी यावर उत्तर दिले. असं त्यांनी एएनआय वृत्त संस्थेशी बोलताना म्हटलंय.

काय आहे प्रकरण?

कोरोना काळात बीएमसीकडून कोव्हीड सेंटर मध्ये वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्यासाठी बाहेरील कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. आणि यामध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला वरळी आणि दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट प्राप्त झाले. मात्र ही कंपनीच बोगस असल्याचा आणि कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय क्षेत्रात अनुभव नसल्याचा आरोप करत यामध्ये 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे या कंपनी आणि कंपनीच्या भागीदाराच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे फेब्रुवारी 2022 मध्ये तक्रार केली आणि यासंदर्भात ऑगस्ट 2022 मध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा