Nana Patole | Satyajeet Tambe Team Lokshahi
राजकारण

सत्यजित तांबेंबद्दल पटोंलेंनी दिली महत्त्वाची माहिती; म्हणाले, कॉंग्रेसमधून...

शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात येणार - नाना पटोले

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच दुसरीकडे विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूकावरून प्रचंड गोंधळ सुरु आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. परंतु, नाशिकच्या जागेवरून माविआमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. काँग्रेसने विद्यमान आमदार सत्यजीत तांबे यांच्याऐवजी त्यांचे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला आहे. त्यावरूनच सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर आता सत्यजीत तांबे यांना पक्षातून निलंबित केले आहे.

नाशिकमधील महाविकास आघाडीचा उमेदवार कोण यासंदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीत आज महाविकास आघाडीच्या वतिने कॉंग्रेसकडून नाना पटोले, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. यावेळी नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि कोकण विभागातील महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत हे जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये नागपूरमधून सुधाकर अडबाले, अमरावतीमधून धीरज लिंगाडे, औरंगाबादमधून विक्रम काळे, नाशिकमधून शुभांगी पाटील आणि कोकणातून बाळाराम पाटील हे अधिकृत उमेदवार असल्याचे महाविकास आघाडीने जाहीर केले आहे.

यावेळी बोलताना कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मोठी माहिती दिली. भाजपनेही सत्यजित तांबे यांच्याबाबत भूमिका जाहीर करावी असे आवाहन करत सत्यजित तांबे यांनाही कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आल्याचे सांगितले आहे. शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात नक्की येणार असून ते रुग्णालयात आहे लवकरच ते बाहेर येतील असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा