राजकारण

गणपत्ती बाप्पा मोरया, काँग्रेसचं सरकार पाहायला पुढच्या वर्षी लवकर या : यशोमती ठाकूर

राज्यभरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाची विसर्जन मिरवणूक सुरु आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यभरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाची विसर्जन मिरवणूक सुरु आहेत. तर,राजकीय नेतेही गणरायाचे दर्शन घेत प्रार्थना करत आहे. अशातच, कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलेलं ट्विट चर्चेत आले आहे. गणपत्ती बाप्पा मोरया काँग्रेसचं सरकार पाहायला पुढच्या वर्षी लवकर या, असे ठाकूर यांनी म्हंटले आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अनंत चतुर्दशीचा दिवस मनाला चटका लावणारा असतो. श्री गणेशाचं विसर्जन करत असताना पुढच्या वर्षी लवकर याचा नारा देताना सगळ्यांच्याच डोळ्याच्या कडा पाणवतात. श्री गणेश बुद्धीची देवता मानली जाते. आज गणेशाच्या विशेष आशीर्वादाची गरज देशाला आहे. देशात ध्रुवीकरणाचं विष पसरवलं जात आहे, या षडयंत्रापासून या देशाला वाचव अशी प्रार्थना श्री गणेशाच्या चरणी करते, अशी प्रार्थना त्यांनी केलं आहे.

दरम्यान, कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या घरचा गणेशाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अशोक चव्हाण यांनी भन्नाट डान्स केला आहे. या डान्सची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."

Trade Deal Ith America : "राष्ट्रीय हित हेच आमचं सर्वोच्च" ; अमेरिकासोबत व्यापार कराराबाबत पीयूष गोयल यांचे स्पष्टविचार

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान