Nana Patole | jai baliraja  Team Lokshahi
राजकारण

‘जय बळीराजा’ म्हणा.., काँग्रेस कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचं आवाहन

भारतीय राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा आवळू नका; जितेंद्र आव्हाड

Published by : Shubham Tate

Nana Patole : राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फोनवर बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचा निर्णय जाहीर केला. मुनगंटीवारांच्या या निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. सुधीर मुनगंटीवारांनंतर आता काँग्रेसच्या नव्या घोषणेची चर्चा आहे. मुनगंटीवारांच्या 'वंदे मातरम'च्या घोषणेनंतर आता काँग्रेसनं जय बळीराजाची घोषणा दिली आहे. (congress president Nana Patole workers to say jai baliraja instead of vande mataram)

"वंदे मातरमला आमचा विरोध नाही. मात्र, जय बळीराजा म्हणणं यामागे आमची शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. बळीराजा हा देशाचा पोशिंदा आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही जय बळीराजा म्हणणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात बोलताना वंदे मातरम् आमचा स्वाभिमान आहे, पण बळीराजा जगाचा पोशिंदा आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

दरम्यान, भारतीय राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा आवळू नका, अशी प्रतिक्रिया हॅलोऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. कोणी काय खावं, काय घालावं, काय बोलावं हे तुम्ही ठरवणार का? असा खोचक सवालही त्यांनी मुनगंटीवारांना केला आहे. ‘वंदे मातरम’ नाही म्हटलं तर तुरुंगात टाकणार का? अशी विचारणाही आव्हाड यांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा