Raj Thackeray in MNS Melawa Team Lokshahi
राजकारण

राज ठाकरे व मनसैनिकांच्या भुमिकेत विरोधाभास?

असताना राज ठाकरेंनी भाषणातून महाविकास आघाडीवर विशेषत: राष्ट्रवादी व शिवसेनेवर निशाणा साधला मात्र, भाजपवर टीकास्त्र डागलेलं नाही.

Published by : Vikrant Shinde

काल (02-04-2022) तब्बल 2 वर्षांनी मनसेचा गुढी पाडवा (MNS Melawa) मेळावा पार पडला. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) मेळाव्यात काय बोलणार ह्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं असताना राज ठाकरेंनी भाषणातून महाविकास आघाडीवर विशेषत: राष्ट्रवादी व शिवसेनेवर (NCP & Shivsena from MVA Goverment) निशाणा साधला मात्र, भाजपवर (BJP) टीकास्त्र डागलेलं नाही. त्यामुळे, मनसेने भाजपशी जवळीक साधली का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. असं असलं तरीही मनसैनिकांची (MNS Workers) भुमिका काही वेगळीच दिसली.

राज ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर घरी परतणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी दादर (Dadar) इथे लागलेलं भाजपचं (BJP Poster) भलं मोठं पोस्टर फाडण्याचा प्रयत्न केला. पोस्टर फाडणे शक्य झाले नाही तेव्हा भाजपच्या बॅनरवर मनसेचं बॅनर (MNS Poster) मनसैनिकांनी लावलं. मुंबई मेट्रोचं (Mumbai Metro) श्रेय घेणार्‍या भाजपच्या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांचे फोटो होते. भाजपच्या बॅनरवर मनसेचे बॅनर लागल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी येथे प्रचंड जल्लोषही केला.

त्यामुळे कालच्या भाषणातून राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे भाजपशी साधलेली जवळीक मनसैनिकांच्या पचनी पडली नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pigeon Feeding : नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Accident : मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात; 4 मुलं जखमी

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे