मंगेश जोशी | जळगाव जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच कोविडचे निर्बंध देखील सुरू आहेत. अशात भारतीय जनता पक्षाने १ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढून हजारोंचा जमाव एकत्र केला आणि नियमांचे उल्लंघन केले याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत माजी मंत्री गिरीश महाजनांसह इतरांवर गुन्हा केला आहे
जळगावमध्ये भाजप कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये हजारों कार्यकर्ते आले होते आणि त्यांनी कोरोना नियमांचं पालन केल नाही तसेच जमावबंदी नियमाचे उल्लंघन केले.या प्रकरणी पोलीस कर्मचारी राकेश दुसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माजी मंत्री गिरीश महाजन, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, चंदुलाल पटेल, संजय सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.