Kunal Tilak  Team Loskshahi
राजकारण

हॅलो, कसबा पोटनिवडणुकीसाठी तुमचे तिकीट फायनल झालेय...; भाजप नेत्याला सायबर चोरट्यांचा फोन

तिकीट निश्चित झाल्याचे सांगत पैशांची केली मागणी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसबा पेठची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली असून इच्छुकांनी उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. परंतु, अवघे 25 दिवस राहिले असले तरीही अद्याप कोणत्याच पक्षाकडून अधिकृत उमेदवार घोषित झालेला नाही. यामुळे उमेदवारीबाबत इच्छुकांमध्ये संभ्रम आहे. याचाच फायदा घेउन एक भामट्याने थेट भाजप नेत्यालाच फसविण्याचा प्रयत्न केला आहे. कसबा पोटनिवडणूकीसाठी तिकीट फायनल झाल्याचं सांगत कुणाल टिळक यांना फसवणुकीचा फोन आल्याचे समजत आहे.

कुणाल टिळक हे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे सुपुत्र आहेत. कुणाल यांना एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर फोन करून मी दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून बोलतो आहे, असं सांगितलं. तसेच, तुमचे आगामी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तिकीट निश्चित झाले आहे. तिकीट निश्चित झाल्यामुळे तुम्ही युपीआयने या नंबरवर ७६ हजार रुपये पाठवा, असे देखील त्या भामट्याने कुणाल टिळक यांना सांगितले. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने कुणाल यांनी त्या व्यक्तीला कुठलीच दाद दिली नाही. आणि हा सगळा प्रकार त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पक्षाला कळवला. दरम्यान, या फसवणुकीच्या कॉलची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ajit Pawar : दादा आमच्या बांधावर या..., काय म्हणाले अजितदादा पूरग्रस्तांना ?

ICC ने 'या' क्रिकेट संघाचे सदस्यत्व केलं निलंबित, नेमकं कारण काय?

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्री फडणवीस माढ्यात दाखल; नुकसानीची पाहणी करणार

kolkata Heavy Rainfall : कोलकात्यात पावसाचा कहर; 10 जणांचा मृत्यू