Devendra Fadnavis|Uddhav Thackeray Team Lokshahi
राजकारण

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर; इतकी ‘बालबुद्धी’ असावी...

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार, आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही.

Published by : Sagar Pradhan

मुंबई : राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली असताना त्यातच आज शिवसेना ठाकरे गटाचा मुंबईत मेळावा पार पडला. यावेळी मेळाव्यात बोलताना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या याच टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.

काय केली देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनी टीका?

उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे ! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका. असा सल्ला त्यांनी ठाकरेंना दिला.

पुढे ते म्हणाले की, चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा. सामान्य शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर. मुंबईला कुणी लुटले यावर? मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले? मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर? 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर? असे तिखट सवाल त्यांनी ठाकरेंना केला.

सोबतच ते म्हणाले की, तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार, आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा) तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या.बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते. अशी जोरदार टीका त्यांनी केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा