राजकारण

मुंबईतील किनारपट्टीवरील २५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासाचा फैसला दोन ‍महिन्यात : मुख्यमंत्री

भाजपा आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. याला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : सीआरझेड २ मध्ये येणाऱ्या मुंबईच्या किनापट्टीवरील झोपडट्यांच्या पुर्नविकासाच्या विषयात मुंबई महापालिका आणि एसआरएमार्फत पर्यावरणी खर्च आणि फायदा विश्लेषण अहवाल तयार करण्यात येत असून हा अहवाल या सर्व झोपडपट्ट्यांच्या पुर्नविकासाबाबत अत्यंत महत्वाचा असून हा अहवाल येत्या दोन ‍ महिन्यांत तयार करुन केंद्र सरकारला सादर करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. त्यामुळे मुंबईतील सुमारे २५ हजार झोपड्या व त्यामध्ये राहणारे सव्वालाख नागरीकांच्या घरांचा फैसला दोन महिन्यांवर येऊ ठेपला आहे

समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या मुंबईतील झोपडट्ट्यांमधील सुमारे २५ हजार झोपडपड्या या सीआरझेड २ मध्ये येतात. केंद्रीय पर्यावरण वन व वातावरणीय बदल मंत्रालयाच्या ६ जानेवारी २०११ च्या सीआरझेड अधिसूचना २०११ नुसार या झोपड्यांच्या पुर्नविकासाला अटी-शर्थी घालण्यात आल्या होत्या. यानुसार पुर्नविकास करायचा झाल्यास ५१ टक्के भागीदारी ही शासनाला देण्याची अट घालण्यात आली. त्यामुळे या झोपडपट्ट्यांचा पुर्नविकास रखडला.

त्यानंतर केंद्रीय पर्यावरण खात्याने १८ जानेवारी २०१९ लाही अधिसूचना बदलली. पण त्यामध्ये संरक्षित झोपड्यांच्या पुर्नविकासाबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे त्याबाबत स्पष्टता देण्यात यावी अशी विनंती करीत राज्य शासनाला ८ जानेवारी २०१९ ला पत्र पाठवले होते. त्यानंतर केंद्र शासनाने याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. दरम्यानच्या काळात मुंबईचा नवा विकास आराखडा तयार करण्यात आला. त्यामध्ये किनाऱ्यावरील जागांवर उद्याने व मैदाने अशी आरक्षणे टाकून ही जागा ना विकास क्षेत्र करण्यात आले. त्यामुळे या झोपडपट्ट्यांच्या पुर्नविकासाचा मार्ग अधिकच खडतर झाला.

दरम्यानच्या काळात केंद्रीय पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालयाने याबाबत नवी दिल्ली येथे या विषयावर बैठक घेतली. यामध्ये या झोपड्यांना पुर्नविकासाला परवानगी दिली तर त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल, याचा अहवाल सादरण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य शासनाला दिले. राज्य शासनाने हा विषय मुंबई महापालिका व एसआरए अंतर्गत येत असल्याने पर्यावणीय खर्च व फायदा विश्लेषण अहवाल तयार करण्याचे निर्देश सदर दोन प्राधिकरांना दिले. ही सर्व प्रचंड मोठी प्रक्रिया लक्षात आणून देत भाजपा आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.

यावेळी ते म्हणाले की, मुंबईला आपण झोपडपट्टी मुक्त करु पाहतोय. पण, मुंबईतील वरळी, वांद्रे, खार, जूहू, वर्सोवा, धारावी या भागात सीआरझेड २ मध्ये येणाऱ्या सुमारे २५ हजार झोपड्या व त्यामध्ये राहणारे १ लाख २५ हजार नागरीक या सरकारच्या निर्णयाची वर्षानुर्वे वाट पाहत आहेत. आता वातावरणीय बदल आणि विश्लेषण अहवाल सादर करण्यासाठी जे काम पालिका आणि एसआरएला देण्यात आले. तो अहवाल केंद्राला कधी सादर होणार, असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला. त्याला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, हा अहवाल येत्या दोन महिन्याच्या आत तयार करुन केंद्र सरकारला सादर करण्यात येईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 IND vs PAK Live Update : पाकिस्तानची टोळी 127 धावांवर बाद, भारतासमोर 128 धावांचे आव्हान

PM Narendra Modi On Congress : “मी शिवाचा भक्त, विषही प्राशन करेन” पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना दागिने खरेदी करण्यासाठी उत्तम योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार