राजकारण

गणेशोत्सवसंदर्भात झालेल्या बैठकीत काय निर्णय झाले; दिपक केसरकर यांनी सांगितले...

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' संवाद महाराष्ट्राच्या प्रगतीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Published by : shweta walge

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' संवाद महाराष्ट्राच्या प्रगतीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी गणेशोत्सवसंदर्भात झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत माहिती दिली आहे.

ते म्हणाले की, गणेश मंडपाकडून भाढी घ्यायची नाहीत अत्यल्प अशा प्रकारच्या दरात भाडे घ्यायचे. त्यांची थकबाकी जी आहे त्यातील 50% माफ करायची आणि व्याज पूर्ण माफ करायचा. मंडळाच्या त्यांच्या अनेक मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याच दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे.

रात्री 10 नंतर स्पीकर चालू राहतो ते त्यांना यामध्ये कुठेतरी रिलीफ मिळाला पाहिजे. यासाठी मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कमिशनर यांच्यासोबत बोलेना. ही संपूर्ण प्रक्रिया मी लवकरात लवकर पूर्ण करू.

आपण म्हणतो की आपल्या राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे. त्यामुळे सन समारंभांवर कारवाई होत असेल तर ते आपण नक्की त्यात लक्ष घालू. गणपतीच्या काळात मुंबई लोकल रात्रभर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती केसरकर यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शाडूच्या मुर्त्या अनेक ठिकाणी बनतात त्यासाठी सिंधू रत्न हा पुरस्कार आणत त्यांना 75 टक्के सबसिडी देत आहोत. आता जवळपास गणपती पूर्ण होत आलेले आहेत. त्यामुळे अनेक तंत्रज्ञानाचा कदाचित पुढच्या वर्षी आपण त्यांना दिलासा देऊ, असं देखील ते म्हणाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

A Historical Record of Japan : जपानची बातच न्यारी!; आता अवघ्या 1 सेंकदात होणार इतके चित्रपट डाऊनलोड

Gaza Situation : अन्न-पाण्यासाठी झुंजताना शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांचे बळी

Google Online Courses : गुगलच्या 'या' मोफत कोर्सेसमुळे करिअरमध्ये प्रगतीची संधी

Rohit Pawar On ED Action : '...आणि म्हणून माझ्या एकट्यावर EDची कारवाई केली' रोहित पवारांनी सगळंच सांगितलं