Deepak Kesarkar | Aditya Thackeray team lokshahi
राजकारण

...तर धनुष्यबाणही तुमच्या कामाला येणार नाही, दीपक केसरकरांचा ठाकरेंवर निशाना

काँग्रेस-एनसीपी सोबत बाळासाहेबांनी कधी युती केली असती का?

Published by : Shubham Tate

Deepak Kesarkar Aditya Thackeray : आम्ही कुठंही मातोश्री किंवा शिवसेना भवनवर दावा केलेला नाही. केवळ बाळासाहेबांशी नातं असल्याने आपला मान जपला जाईल. मात्र शिवसैनिक जगले पाहिजे. ते आहेत म्हणून पक्ष आहे. एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. बाळासाहेबांचा विचार मी शिवसैनिकांना शिकवला पाहिजे असं अजिबात नाही. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीचा मोठेपणा टिकवणं गरजेचं आहे, असा सल्ला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिला आहे. (Deepak Kesarkar targets Aditya Thackeray)

तसेच बंडखोर आमदारांवर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना आता बंडखोर नेत्यांनीही खडेबोल सुनवायला सुरवात केल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे कार्यकर्तेही आता पाठ फिरवू लागलेत. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत शिवसेना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत. मुंबईमध्ये सध्या आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरू आहे. आमदारांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले दिसले. आदित्य ठाकरे यांनी सकाळीच पाठीत खंजीर खुपसला म्हणत, दम असेल तर पुन्हा निवडणुका घेऊन निवडून येऊन दाखवा असा इशारा दिला होता. त्याला आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

जो खरा शिवसैनिक आहे, त्याने बाळासाहेबांच्या प्रेमापोटी शिवसेना मोठी केली आहे. आज जी विधाने होत आहेत. याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. काँग्रेस-एनसीपी सोबत बाळासाहेबांनी कधी युती केली असती का? शिंदे असोत भावना गवळी असोत यांना पक्षातून काढण्यात आले मग त्यांना बोलावणे पाठवले. आज हकालपट्टी करण्याचा सत्र सुरू आहे. बाळासाहेबांची विचारधारा हिंदुत्वाची होती त्यामुळे लोक जोडली गेली, असे केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Wari 2025 : आषाढीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य