राजकारण

Uddhav Thackeray-Eknath Shinde दोन दिवसांत चर्चेसाठी एकत्र येणार? दिपाली सय्यद यांच्या ट्विटमुळं चर्चांना उधाण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांना भेटणार का? असा सवाल उपस्थित होत असताना शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्या ट्वीटमुळं चर्चांना उधाण आलं आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 शिवसेना आणि 10 अपक्ष आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळताच एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अशात उद्धव ठाकरे खरंच पुन्हा भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडत आहे. यादरम्यान शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्या ट्वीटमुळं चर्चांना उधाण आलं आहे.

दिपाली सय्यद (Deepali Syed) यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्तीकरता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल, असं ट्वीट शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केलं आहे.

सोबतच त्यांनी एक ट्वीट त्याआधीही केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, लवकरच आदित्य ठाकरे मंत्रीमंडळात दिसावेत, शिवसेनेच्या 50 आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

दिपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती. त्याआधी 9 तारखेला एक ट्वीट करत म्हटलं होतं की, उद्धवसाहेबांनी आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे नेहमीच उघडे ठेवले असून एकनाथ शिंदे यांच्यावतीने प्रवक्ते आणि आमदारांनी उद्धव साहेबांशी चर्चा करण्याची विनंती केली आहे. ही सर्व घटना शिवसेनेचा भाजपावर असलेल्या हिंदुत्वाच्या विश्वासामुळे घडली असून भाजपाने मोठ्या मनाने मध्यस्ती करावी, असं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात