राजकारण

केजरीवाल सरकारला मोठा झटका! दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेशी संबंधित अध्यादेशाचे विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आले. यामुळे केजरीवाल सरकारला मोठा झटका बसला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेशी संबंधित अध्यादेशाचे विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आले. यामुळे केजरीवाल सरकारला मोठा झटका बसला आहे. हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे. मतदानादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला.

अमित शहा म्हणाले, अध्यादेश हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देतो, यामध्ये म्हटले आहे की सरकारला दिल्लीशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर कायदा करण्याचा अधिकार आहे. संविधानातही आम्हाला हा अधिकार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, राजाजी, राजेंद्र प्रसाद आणि डॉ.बी.आर. आंबेडकर दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्याही विरोधात होते. विरोधी आघाडीला दिल्लीची चिंता नसून केवळ महायुतीची चिंता असून राजकारणासाठी ते विधेयकाला विरोध करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे. यादरम्यान सभापती ओम बिर्ला बोलत असताना आपचे खासदार सुशील कुमार रिंकू यांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांवर कागद फाडून फेकले. यासाठी सुशील कुमार रिंकू यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. सुशील कुमार रिंकू हे आम आदमी पक्षाचे लोकसभेतील एकमेव खासदार आहेत. विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

विधेयकात काय तरतूद आहे?

केंद्र सरकारच्या वतीने, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी (1 ऑगस्ट) लोकसभेत राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली सरकार (दुरुस्ती) विधेयक, 2023 सादर केले. यामध्ये दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनाबाबत अंतिम अधिकार उपराज्यपालांना देण्याची तरतूद आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 IND vs PAK Live Update : पाकिस्तानची टोळी 127 धावांवर बाद, भारतासमोर 128 धावांचे आव्हान

PM Narendra Modi On Congress : “मी शिवाचा भक्त, विषही प्राशन करेन” पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना दागिने खरेदी करण्यासाठी उत्तम योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार