uddhav thackeray Devendra Fadnavis Team Lokshahi
राजकारण

आजचा दिवस महत्वाचा, राज्यपालांकडे नजरा

राज्यपालांना दिलेल्या पत्रात आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांचा उल्लेख

Published by : Team Lokshahi

devendra fadnavis : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आतापर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस आज दुपारी राजधानी नवी दिल्लीत होते. दिल्लीत त्यांनी भाजपाध्यक्ष जे.पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राज्यपाल यांना सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगा, अशी मागणी भाजपा नेत्यांनी केली आहे. (devendra fadnavis and bjp leader reached raj bhavan to meet governor bhagat singh koshyari)

राज्यपालांना ईमेलद्वारे आणि प्रत्यक्षात पत्र दिले आहे. शिवसेनेचे 39 आमदार बाहेर आहेत. काँग्रेस, राष्ट्रावादीसह आम्हाला रहायचं नाही अशी यांची भूमिका आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्र्याजवळ बहुमत शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे सरकारला तातडीने बहुमत सिद्ध करण्यास सांगावं असं पत्र आम्ही राज्यपालांना दिलं, राज्यपालांना दिलेल्या पत्रात आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांचा उल्लेख केलाय. त्याआधारे राज्यपाल उचित निर्णय घेतील आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी योग्य तो निर्देश देतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आतापर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस आज दुपारी राजधानी नवी दिल्लीत होते. दिल्लीत त्यांनी भाजपाध्यक्ष जे.पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ते मुंबईत आले आणि त्यानंतर राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत जाऊन अमित शाह, महेश जेठमलानी यांच्यासोबत कायदेशीर बाबींवर चर्चा केल्याची माहिती आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!

Teachers Strike : शिक्षकांची शाळा बंदची हाक, सरकारला दिला आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट