विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं. नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज विधानसभेमध्ये पहिल्यांदाच बोलत आहेत. यावेळी त्यांनी ईव्हीएमवरून विरोधकांना लक्ष केलं आहे.
ईव्हीएमवरून सुनावलं
मारकडवाडी प्रकरणावरुन शरद पवार पहिल्यांदाच ईव्हीएमबाबत बोलल्याचं आश्चर्य वाटल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केलं आहे. राम सातपुते यांनी मारकडवाडी परिसरात 22 कोटींची कामं केल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. निकाल आपल्या बाजूनं लागला की लोकशाहीचा विजय, नाहीतर सर्वोच्च न्यायालयावरही संशय घेतो असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. संवैधानिक संस्थांवर संशय घेणं म्हणजे संविधानाचा अपमान तसंच राजद्रोह आहे. निवडणूक आयोगांनं ईव्हीएम वरुन आव्हानं दिलं तेव्हा त्यांना उत्तर का नाही दिलं? असा सवालही त्यांनी केला आहे. विरोधकांची फेक नॅरेटिव्ह फॅक्टरी आहे.
लाडकी बहिण योजनेचा पुढील हफ्ता कधी?
हिवाळी अधिवेशन संपल्याबरोबर लाडकी बहिण योजनेचा पुढील हफ्ता देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
मुंबई मेट्रो ३ अंतिम टप्प्यात
मेट्रो ३ बाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा केली आहे. बीकेसी ते कुलाबा हा तिसरा टप्पा मे २०२५ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मट्रो ३ ने दररोज १७ लाख लोकं प्रवास करतील.
"ग़ालिब ताउम्र ये भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा..." शेरोशायरीतून फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे. विरोधकांनी पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्यापेक्षा आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे.
अर्बन नक्षलवादाच्या माध्यमातून लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न
देशाच्या निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेप सुरू झाले असल्याचे पुरावे समोर आले आहेत. भारत जोडो आंदोलनामध्ये कोण आलं होतं. देशात नक्षलवादाविषयी लढाई पुकारली आहे. नक्षलवादी काय म्हणतात, देशातील संविधानावर विश्वास नाही, भारताच्या लोकशाहीवर विश्वास नाही देशातील संविधाने तयार केलेल्या कोणत्याही संस्थेवर विश्वास नाही. म्हणून पॅरेलल सिस्टीम सुरु करण्याचा प्रयत्न करतात. आम नक्षलवादी संपायला लागले तेव्हा अराजकतेचे विचार तरूणांमध्ये रूजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. फ्रँटल ऑर्गनायझेशन तयार करण्यात आल्या. म्हणून आता त्यांनी अर्बन नक्षलवाद सुरू केला. देशातील प्रत्येक संस्थेविषयी नागरिकांच्या मनात संशय निर्माण करायचा. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे लोकं बंड करतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान तोडून अराजकाचे राज्य इथे आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो अभियानावरून देवेंद्र फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्र एटीएसनं केंद्र सरकारला माहिती दिली होती. अर्बन नक्षलवादी म्हणून ज्या 40 संघटना घोषित केल्या होत्या, त्यातल्या 13 संघटना भारत जोडो यात्रेत होत्या असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
संपूर्ण भाषण पाहण्यासाठी क्लिक करा-