राजकारण

ललित पाटीलला शोधून काढू; फडणवीसांची ग्वाही

ड्रग्स माफिया ललित पाटील 12 दिवस उलटल्यानंतरही सापडला नसल्याने विरोधकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झालसा आहे. 12 दिवस उलटल्यानंतरही ललित पाटील सापडला नसल्याने विरोधकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ललित पाटीलला शोधून काढू, त्याचे सहकारी सापडलेत ललितही सापडेल, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

क्राइम कंट्रोल कॉन्फरन्स घेतली होती, तेव्हा सर्व अधिकाऱ्यांना ड्रग्सवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. सर्व अधिकाऱ्यांनी त्याबद्दल काय कारवाई केली पाहिजे. मुंबईने त्याबद्दल कारवाई सुरू केली आहे, आता हळूहळू राज्यातील सर्व ठिकाणचे पोलीस त्याबद्दल कारवाई करत आहे. केंद्र सरकार ही त्याकडे लक्ष केंद्रित करत आहेत. जिल्हा पातळीवर समित्या स्थापन केल्या असून त्या समित्या कारवायांवर लक्ष ठेवून आहेत, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

दरम्यान, समृध्दी महामार्गावरील अपघाात अतिशय गंभीर आहे. अनेकांचे जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल. या व्हिडिओची गंभीर दाखल घेतली जाईल. अशा वाहनचालकांवर कारवाई केली जाईल. सोबतच जास्तीत जास्त जागृती करण्यासाठी प्रयत्न केले जाईल, अशी माहिती फडणवीसांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य