devendra fadnavis winter session  Team Lokshahi
राजकारण

मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची...; फडणवीसांनी कर्नाटकला ठणकावले

कर्नाटकचे विधानपरिषदेचे आमदारांच्या दाव्यावरुन हिवाळी अधिवेशनातील राजकीय वातावरण चांगलेच तापले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : कर्नाटकचे विधी मंत्री माधूस्वामी यांनी मुंबई केंद्रशासित करावी, अशी मागणी त्यांच्या विधानसभेत केली आणि मुंबईत २० टक्के कन्नड लोक राहतात, असा जावईशोधही लावला आहे. कर्नाटकचे विधानपरिषदेचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबई तर कर्नाटकचीच आहे, असा दावा केला आहे. यावरुन आज हिवाळी अधिवेशनातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही, असे ठणकावले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला विषय महत्त्वाचा आहे. मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही. त्या विधानांचा आम्ही निषेध करतो. विरोधी पक्षनेत्यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्रीय गृहमंत्र्यांना निषेधाचं पत्र पाठवू. गृहमंत्र्यांसमोर जे ठरलं आहे त्याचे उल्लंघन करणे हे दोन राज्यांमधील संबंधांसाठी योग्य नाही. हे त्यांना कडक शब्दांत सांगण्यात येईल. तसेच, तुमच्यासमोर जे ठरले होते त्याचे कर्नाटक पालन करत नसल्याचेही गृहमंत्र्याच्या निदर्शनास आणले जाईल. केंद्रीय गृहमंत्र्यांनीही कर्नाटकच्या अशा बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे, अशी विनंतीही करण्यात येईल, असेही फडणवीसांनी सांगितले.

मी पुन्हा सांगतो की, मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही. त्यावरचा कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही, असे फडणवीसांनी सभागृहात ठणकावून सांगितले. सरकार नव्हे तर सभागृह म्हणून निषेध असून या सभागृहाच्या भावना कर्नाटक सरकार, केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जातील, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री, आमदार, मंत्री सातत्याने महाराष्ट्राच्या भावना दुखावण्याचा व महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम करत आहेत. अमित शहा यांच्याशी चर्चा होऊनही सीमावासियांच्या भावनेला ठेच पोचवण्याचे काम कर्नाटक सरकारकडून वारंवार केले जात आहे. याबाबत गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त करा व सक्त ताकीद द्या, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा