राजकारण

'भाजप आणि ओरिजनल शिवसेना एकत्रित निवडणूक लढू, मुंबई पालिकेवर भगवा फडकवू'

देवेंद्र फडणवीस यांची आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात प्रतिक्रिया

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्पना नालस्कर | मुंबई : राज्यात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर समीकरण बदलून गेले आहेत. त्यातच आता संधीचा फायदा घेत भाजपने जोरदार फिलडिंग लावली आहे. भाजपने थेट आता राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ल्यावर झेंडा फडकावण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपचे बडे नेते बारामती दौरा करणार आहेत. परंतु, महाराष्ट्र भाजपचे मिशन महाराष्ट्र आहे आणि बारामती महाराष्ट्रामध्ये आहे. आमच्यासाठी प्रत्येक सीट महत्त्वाची आहे, असे स्पष्टीकरण उउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

मुंबई महानगरपालिका आपली शेवटीची निवडणूक समजून लढा, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावर विरोधकांकडून टीका करण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, मी असं सांगितलं की कुठलीही निवडणूक लढत असताना आपल्या जीवनातली शेवटची निवडणूक आहे असं समजून जेव्हा तुम्ही झोकुन देता तेव्हाच आपल्याला ती निवडणूक जिंकता येते. माझे वाक्य फक्त मुंबई महानगरपालिकेसाठी नव्हते. तर निवडणुकीच्या एकंदरीत रणनीती संदर्भात होते.

तर, भाजपचे मिशन इंडिया आहे. महाराष्ट्र भाजपचे मिशन महाराष्ट्र आहे आणि बारामती महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून बारामती मिशन महाराष्ट्रामध्ये आहे. असं लास्ट फ्रंटीयर वगैरे काही नसतं. आमच्यासाठी प्रत्येक सीट महत्त्वाची आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

मंत्रालयात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या फोटो लावण्याच्या अनिवार्यता करण्यासंबंधी देवेंद्र फडणवीस म्हणाले, सगळ्यांच्या मनामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आहेत. त्यामुळे फोटो लावण्याची अनिवार्यता करण्याची गरज नाही. मात्र, सरकारी कार्यालय नियम व आदेशाने चालतात. त्यामुळे आदेश काढले आहे. महाराष्ट्र आणि देशामध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जो मान आहे तो खूप मोठा आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत युती करणार का, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी ज्याला जसे मनात येते तशी तो बातमी दाखवतो, अर्थ काढतो. तुम्ही पाहत रहा, मी स्पष्टपणे सांगतो की भाजप आणि शिवसेना ओरिजनल म्हणजेच शिंदे गट आम्ही एकत्रित निवडणूक लढू आणि आम्ही मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारे मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर