devendra fadanvis team lokshahi
राजकारण

'नखं कापून शहिद होण्याचा काही लोकांचा प्रयत्न'

देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

Published by : Shweta Chavan-Zagade

भाजपच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त (BJP 42nd anniversary) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील कार्याकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधारी माहाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला आहे. भाजपच्या नेत्यांना दोन-दोन वर्ष तुरुंगात टाकण्यात आले होते. भाजप संघर्षातून मोठा झालेला पक्ष आहे. भाजपला संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे परंतु भाजप खंबीर आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील सत्ताधारी लोकांचं लक्ष्य वेधून करण्याकरता या सर्व गोष्टी करत आहेत. आमच्या नेत्यांच्या घरात माणसं घुसवून मापं घेतली आहेत. मात्र आता पुराव्याच्या आधारे गोष्टी मिळाल्या आहेत. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करून त्याला लुटण्याचं काम सुरु असल्याचं स्पष्ट झालं आहे. लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा काहींचा प्रयत्न असतो. मात्र आता जनतेला कळलं आहे, असा हल्लोबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

यावेळी महाराष्ट्र सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले, आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही मात्र येत्या काळात भ्रष्टाचार आणि राजकारण करून जनतेची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात लढा असणार आहे. सत्ताधाऱ्यांनी वर्षानुवर्ष या भ्रष्टाचाराच्या विळख्यातून स्वतःच्या प्रॉपर्टी तयार केल्या आहेत. भ्रष्टाचार करत महाराष्ट्राची संस्कृती पायदळी तुडवण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे. महाराष्ट्राची प्रतिमा संपूर्ण देशामध्ये मलीन करण्याच काम सुरु आहे. त्यामुळे राज्याला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी एक मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचेही ते म्हणाले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा