जुन्नर/पुणे : कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नगर-कल्याण महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेससह विविध शेतकरी संघटना आंदोलनात सहभाही झाल्या होत्या. जुन्नर तालुक्यातील शेकडो ट्रॅक्टर चालक व मालकांनी ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होऊ कांदा प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारचे या प्रश्नःकडे लक्ष वेधले.
नेमका मुख्यमंत्री कोण
केंद्रीय कृषी मंत्र्यांना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार व खासदार कांदा प्रश्नावर भेटले. तेव्हा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत प्रस्ताव प्रस्ताव पाठवायला सांगा. मात्र, सत्तांतर झाल्यावर 40 पैकी नेमका मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न त्यांनाही पडला असावा, असा चिमटा धनंजय मुंडे यांनी शिंदे सरकारला काढला आहे.
शेतकऱ्यांच्या पोरांची सोयरीक जमेना!
शेतकरी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना संपन्न होता. त्याचा वैभवाचा काळ होता. शेतात कांदा असला की शेतकऱ्याच्या पोराची लगेच सोयरीक व्हायची मात्र आता सोयरीक करायला गेल्यावर विचारतात की जमीन किती आहे? दुर्दैवाने भाजप सरकार आले आणि शेतकरी कंगाल झाला. आज मात्र शेतकऱ्यांच्या पोरांना सोयरीक काही येत नाही, असा मिश्कील टोमना सुद्धा मुंडे यांनी मारला.
भाजप शेतकऱ्यांसाठी कधी आंदोलन केले का?
भारतीय जनता पक्षाने कधीही शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं आहे का? असा प्रश्न करत धनंजय मुंडे म्हणाले की, भाजपने विरोधी पक्षात असताना शहरात आंदोलने केली ती भाव वाढले म्हणून मात्र शेतकऱ्यांसाठी या पक्षाने काहीही केले नाही,
सरकारला पालकमंत्री मिळेना...
नवे सरकार आले पण अजूनही मंत्र्यांनी पदभार सांभाळले नाहीत. यावर टोमणा मारताना मुंडे म्हणाले की, सरकारचे बंड झाले 20 जूनला त्यानंतर सुरतेवरून गुहावटी, गोवा शपथ झाला. मात्र, अजूनही सरकारला पालकमंत्री मिळाला नाही. अजून किती दिवस लागतील? आणि तुमचे आमचे प्रश्न कळायला किती दिवस लागतील हे शून्याचा शोध लावणाऱ्यालाही कळणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
सरकार देव भरोसे...!
नवीन सरकार आले. पण, फक्त गणपती दर्शन घेत फिरत आहेत. फिरुद्या त्यांना ते नवीन आहेत. हे सांगत मुंडे म्हणाले, एक नाही दोन नाही 250 गणपती दर्शन केले?. लोकसंख्या वाढली देवही वाढले असतील. घेऊद्या दर्शन. पण, या सरकारला जनतेचा आशीर्वाद नको तर देवांचा आशिर्वाद हवाय. त्यांना भीती आहे टिकलो तर देवाच्या आशिर्वादावर टिकू, असाही टोमणा मुंडेंनी शिंदे सरकारला मारला आहे.
निवडणुका आता व्हायला पाहिजे होत्या
हे सरकार आल्यापासून 250 ते 300 निर्णय घेतले. मात्र, अंमलात फक्त 75 आणले. त्यातले सगळे निर्णय निवडणुकीवर घेतले. आणि आता सगळ्या निवडणूका पुढे ढकलल्या. सर्व निवडणुका आता व्हायला पाहिजे होत्या. मग, त्यांना कळेल कोण तुमच्या मागे आहे? बाबा आपलं काही ok मधी नाही म्हणून लांबलेल बर, असेही मुंडे यांनी म्हंटले आहे.