Aditya Thackeray | Eknath Shinde team lokshahi
राजकारण

मी 32 वर्षाचा, मी राजकारणात ही चूक केली का? आदित्य ठाकरेंचा सवाल

दिलीप मामा लांडे यांनी माझा हात हातात घेतला, रडले आणि तिकडं गेले

Published by : Shubham Tate

Aditya Thackeray Eknath Shinde : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) व त्यांच्यासोबतचे ४० बंडखोर आमदार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांची कार्यालयेदेखील फोडण्यात येत आहेत. शिवसैनिकांची हीच आक्रमकता लक्षात घेऊन राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून ठिकठिकाणी सुरुक्षा वाढवण्यात आली आहे. (did I make this mistake in politics? Aditya Thackeray question)

शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी चांगलीच फटके बाजी केली. ते म्हणाले की, ज्यांनी हाऊसमध्ये आवाज दाखवला ते भास्कर जाधव इथं आहेत, शिवसैनिकांमध्ये जोश दिसतोय, जे काही होणार ते चांगलंच होणार आहे. घाण निघून जाणार, अस वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

आपण यांना काय कमी केलं, मातोश्रीपर्यंत ह्या लोकांनी येऊ दिलंच नाही, ही आपलीच चुक आहे. कोविडच्या काळात काळजी घेणारा माणूस म्हणून मुख्यमंत्र्यांची ओळख आहे. मी दावोसला गेलो तर 80 हजार कोटींचं करार करुन आलो असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच मुंबई पालिकेवर भाजपचा डोळा आहे.

मोह नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधी मिळणार? जो महाराष्ट्राला मिळाला आहे. दिलीप मामा लांडे यांनी माझा हात हातात घेतला, रडले आणि तिकडं गेले. प्रकाश सुर्वे यांचीही कामं केली, पालकमंत्री म्हणून मी फंड दिला. तसेच संदीपान भूमरेंच्या मतदारसंघातली किती कामं केली? मी 32 वर्षाचा, मी राजकारणात ही चूक केली का? आदित्य ठाकरेंनी असाही सवाल यावेळी केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज