थोडक्यात
मुख्यमंत्रिपदी मुरलीधर मोहोळ यांचं नाव असण्याच्या चर्चांना ब्रेक
मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा निरर्थक आणि कपोलकल्पित
मुरलीधर मोहोळ यांचं ट्विट
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधी कधी होणार? याविषयी चर्चा सुरु झाली आहे. यातच मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुरलीधर मोहोळ ट्विट करत म्हणाले की, समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे.
आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे. असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.