राजकारण

आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीची धाड

मुंबईत दहाहून अधिक ठिकाणी छापा टाकला जात आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : ठाकरे गाटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. कोविड काळातील कंपनीच्या घोटाळा प्रकरणी ईडीने छापे टाकले आहेत. मुंबईत दहाहून अधिक ठिकाणी छापा टाकला जात आहे.

कोविड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे युवा सेना सचिव सुरेश चव्हाण, आयएएस संजीव जयस्वाल यांच्यासह १६ ठिकाणांवर छापा टाकला आहे. सुरेश चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. चव्हाणांच्या निवासस्थानी ईडीचे पथक पोहोचले आहे.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या सुजीत पाटकर यांच्याशी संबंधित प्रकरणी ईडीने राज्यात छापासत्र सुरू आहे. बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिन्स उभारण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकले गेले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा