Eknath khadse  Team Lokshahi
राजकारण

"शरद पवारांमुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले" खडसेंचा दावा

"राज्यातलं वातावरण राजकीय दृष्ट्या अत्यंत अस्थिर आहे. असं राजकारण या राज्यात गेल्या 40 वर्षात कधी अनुभवलं नाही."

Published by : Vikrant Shinde

मयुरेश जाधव | कल्याण : शिंदे गटातील नेते शिवतारे यांनी शरद पवार राज्याच्या राजकारणातील बरमुडा ट्रँगल आहेत,त्याच्याजवळ गेलेले सगळे संपले शिवसेनेच्या अधपतनाला भाजप नव्हे तर शरद पवार ,अजित पवार जबाबदार असल्याची टीका केली होती. याबाबत बोलताना आमदार एकनाथ खडसे यांनी शिवसेनेवर जे काही झालाय त्यासाठी कोण जबाबदार हे काय जबाबदार आहे हे तर काळच ठरवेल. हे नक्की आहे शरद पवार यांनी एका रात्रीत महाविकास आघाडी निर्माण केली आणि या राज्यामध्ये सत्ता आणली काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र सरकार आलं आणि ते चाललं असा टोला लगावला .

काय म्हणाले खडसे?

"शरद पवार हे बर्मुडा ट्रँगल आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांनी अनेक माणसं मोठे केली त्यांच्यामुळेच उद्धवजी ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले. शरद पवार यांच्यावर आरोप करणे म्हणजे एक मूर्खपणा आहे" असा टोला एकनाथ खडसे यांनी शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांना लगावला डोंबिवलीत लेवा साहित्य सन्मान ठेवण्यासाठी खडसे उपस्थित होते.

राज्यात सुरू असलेल्या राजकारण बाबत एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया:

"राज्यातलं वातावरण राजकीय दृष्ट्या अत्यंत अस्थिर आहे. असं राजकारण या राज्यात गेल्या 40 वर्षात कधी अनुभवलं नाही एकमेकांच्या विरोधात आरोप करणे प्रत्यारोप करणे व्यक्तिगत पातळीवर आरोप करणे ही भूमिका याआधी कधीही नव्हती. राजकारणामध्ये मध्ये निर्मल वातावरण होतं. विरोध विरोधासाठी करायचे मग नंतर सारे एकत्र येत असत. आत्ताचं राजकारण इतकं टोकाचं झालंय की जशी एकमेकांशी दुश्मनी आहे जसं युद्ध सुरू आहे असं सुरू आहे. अशा स्थितीत चिन्ह गोठवणे ,आपल्याच पक्षांमध्ये दुभंगण ,हे अत्यंत दुर्दैवी आहे राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे योग्य नाही" अशी खंत व्यक्त केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?