राजकारण

रश्मी शुक्लांनी फडणवीसांची जेव्हा भेट झाली तेव्हाच क्लीन चीट मिळाली; खडसेंचा गौप्यस्फोट

एकनाथ खडसे यांची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली आहे. यावरुन एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर आगपाखड केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जळगाव : दूध संघाच्या गैरव्यवहारावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणं खडसेंना भोवलं असून शिंदे सरकारने खडसेंना दणका दिला आहे. एकनाथ खडसे यांची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली आहे. यावरुन एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर आगपाखड केली आहे. यादरम्यान, रश्मी शुक्ला यांची देवेंद्र फडणवीस यांची ज्या दिवशी भेट झाली त्या दिवशीच त्यांना क्लीन चीट मिळाली होती, असा गौप्यस्फोट खडसेंनी केला आहे.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणी क्ली चिट मिळाली आहो. यावर एकनाथ खडसे म्हणाले की, रश्मी शुक्ला यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्या दिवशी भेट झाली. त्या दिवशीच त्यांना क्लीन चीट मिळाली होती. तब्बल 68 दिवस माझा फोन टॅप करण्यात आला. या प्रकरणात मुंबई पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल आहे. मात्र फोन कोणत्या कारणासाठी टॅप करण्यात आलं हे कारण मला अद्यापही कळलेले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

तसेच अंडरवर्ल्डच्या संदर्भात ज्यावेळी विधानसभेत प्रश्न मांडत होतो. त्यावेळी पाकिस्तान सौदी अरेबिया, यासह इतर देशांमधून फोनवरून तुम्हाला मारून टाकू संपवून टाकू, अशा धमक्या देण्यात येत होत्या. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली होती. व स्वतः पोलिसांनी संरक्षण सुद्धा दिलं होतं. याच प्रकरणाची आठवण करून देत आता पोलिसांनी अचानक पोलीस संरक्षण काढून घेतलं. असा मुद्दा स्पष्ट करत 50 खोके ज्यांनी घेतली आहेत त्यांचे पोलीस संरक्षण कधी काढणार, असा सवाल विचारत खडसेंनी शिंदे सरकारवर टीका केली.

सरकारच्या विरोधात जो आंदोलन करतो त्याला कशा पद्धतीने त्रास दिला जातो. तसेच ना उमेद केलं जाते, अशीच भूमिका नेहमी सरकारची राहिली असल्याचेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले आहेत. एखाद्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी जर रात्रभर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करून झोपावे लागत असेल तर जनसामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित करत पुढील काळात जिल्हा दूध संघ अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा