Eknath Shinde | Devendra Fadnavis team lokshahi
राजकारण

'या' 13 बंडखोरांना मिळणार मंत्रीपदे, त्यांची मंत्रीपद कायम राहणार

4 मंत्रीपदे रिक्त ठेवण्याचा निर्णय

Published by : Shubham Tate

Devendra Fadnavis eknath shinde : शिवसेनेचे बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून सोमवारी दिलासा मिळाला. त्यानंतर आता भारतीय जनता पक्षासोबत (BJP) सरकार स्थापन करण्याचा त्यांच्या हालचाली सुरु आहेत. यासंदर्भात चर्चाही झाली आहे. शिंदे गटास उपमुख्यमंत्रीपदासह 13 मंत्रीपद तर भाजपकडे 29 मंत्रीपदे असे सूत्र ठरल्याचे वृत्त आज तकने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यास शिंदे गटातील 8 आमदारांना कॅबिनेट आणि 5 आमदारांना राज्यमंत्रीपद मिळू शकते. त्याचबरोबर 29 कॅबिनेट मंत्री भाजपचे असतील. बंडखोरीसोबत आलेल्या अपक्ष आमदारांना भाजपने त्यांच्या कोट्यातून मंत्री करावे, अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. (eknath shinde camp will get 6 cabinet birth and bjp will have 18 ministers cm will be fadnavis this may the formula for bjp government)

शिंदे गटाचे हे मंत्री होणार

एकनाथ शिंदे + दादा भुसे + गुलाबराव पाटील + संदिपान भुमरे + उदय सामंत + शंभूराज देसाई + अब्दुल सत्तार + राजेंद्र पाटील येडरावकर + बच्चू कडू (प्रहार)

हे नवीन मंत्री

दीपक केसरकर + प्रकाश आबिडकर + संजय रायमुलकर + संजय शिरसाठ यांच्या नावाचा विचार केला जात आहे.

या संदर्भात 40 चा आकडा लक्षात घेतला तर 6 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री पदे शिंदे गटाकडे येऊ शकतात. सुरुवातीला 4 मंत्रीपदे रिक्त ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. भाजपच्या कोट्यातून 2 आणि बंडखोर शिंदे गटातील 2 मंत्रीपदे पुढील समायोजनासाठी रिक्त ठेवण्यात येणार असून, शिंदे गटाकडे 10 आणि भाजपकडे 26 मंत्रीपदे असतील. शिंदे गटातील बंडखोर आमदारांपैकी जे सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत, त्यांचे मंत्रीपद कायम राहणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?