uddhav thackeray eknath shinde  team lokshahi
राजकारण

फडणवीसांचं धक्कातंत्र, आता उद्धव ठाकरे शब्द पाळणार का?

भाजप आणि 16 अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री

Published by : Shubham Tate

Uddhav Thackeray eknath shinde : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती फडणवीसांनी दिली. या निर्णयामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकीय पेचात जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मुख्यमंत्री पदी शिवसैनिक विराजमान होणार असेल तर मी मुख्यमंत्री पदच नाही तर पक्ष प्रमुख पदही सोडण्यास तयार आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे शिंदे गटाला पाठिंबा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (eknath shinde cm bjp shock devendra fadnavis Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या सरकारची जबाबदारी आमची असेल, आज संध्याकाळी साडे सात वाजता एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेना आमदारांची कुचंबना होत होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील.

उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या कॅबिनेटमधील निर्णय अवैध

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला मंजुरी दिली होती. तसेच नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासही मंत्रिमंडळाने परवानगी दिली होती. मात्र, हे निर्णय अवैध असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाचे पत्र पाठवल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची नसते. तरीही उद्धव ठाकरे यांनी ही बैठक घेऊन निर्णय घेतले. त्यामुळे हे निर्णय अवैध ठरले आहेत. आता हे निर्णय पुन्हा नव्याने घ्यावे लागतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा