राजकारण

'टीम इंडियाने मॅच जिंकली, तशीच आम्ही तीन महिन्यांपूर्वी मोठी मॅच जिंकलीयं'

ठाण्यात दिवाळी निमित्ताने दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावली होती.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषकातील हायहोल्टेज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला. यावेळी विराट कोहलीने जोरदार फलंदाजी करत पाकिस्तानला चार विकेट्सने पराभूत करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या विजयाचा जल्लोष देशभरातील नागरीकांनी फटाके फोडून साजरा केला. या सामन्याचा प्रभाव आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही पाहायला मिळाला. काल टीम इंडियाने एक मॅच जिंकली. तशीच मॅच आम्ही तीन महिन्यांपूर्वी जिंकलीय, असे त्यांनी म्हंटले आहे.

ठाण्यात दिवाळी निमित्ताने दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी नागरिकांना शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावरुन जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, टीम इंडियाचा विजय हा आनंदाचा क्षण आहे. तोही उत्सवच आहे. तुम्ही पाहिलं असेल मेलबर्नमध्येही बाळासाहेबांची शिवसेना झळकली. स्टेडियममध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पोस्टर झळकवण्यात आले होते.

कालची मॅच टीम इंडियाने जशी जिंकली. तशीच आम्ही तीन महिन्यापूर्वी एक मॅच खेळलो आणि जिंकलीही. ती या देशाने आणि महाराष्ट्राने पाहिली. ती तुम्हालाही आवडली म्हणून तुम्ही इथे आहात, असे शिंदेंनी म्हंटले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून सर्वांनी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याचेही आवाहनही त्यांनी केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा