Eknath shinde Team Lokshahi
राजकारण

तुम्ही मग बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी आहात का? मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

आम्हाला खोके सरकार म्हणत आहेत. मात्र त्यांचा हिशोब माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहित

Published by : Sagar Pradhan

राज्यात राजकीय घडामोडी वाढत असताना, दसरा मेळावा आणि अनेक विषयावरून सध्या शिंदे गटात आणि शिवसेनेत वाद उफाळत असताना त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बंडखोरीनंतर पहिल्यांदाच राज्यात सभा घेतली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांचा आज मेळावा घेतला. या मेळाव्यात केलेल्या टीकेनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

अडीच वर्ष गटप्रमुखांची आठवण झाली नाही

दिल्लीत राज्यप्रमुखांना भेटण्यासाठी गेले असता, मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर जोरदार प्रहार केला आहे. ते म्हणाले की, त्यावेळी आधी अडीच वर्ष गटप्रमुखांची आठवण झाली नाही, आता वाईट दिवस आले तेव्हा गटप्रमुखांची आठवण आली. अशी टीका करत ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या स्थापनेचा निर्णय कसा चूकीचा होता, हे शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या जवळपास सर्वच टीकांना सडेतोड उत्तरही दिलं.

'तुम्ही बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी?'

उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करताना, आतापर्यंत मुलं पळवणारी टोळी ऐकली होती, पण बाप पळवणाऱ्यांची औलाद आता महाराष्ट्रात फिरतेय असा घणाघात केल्यानंतर शिंदे यांनी यावर उत्तर दिले आहे. ते म्हणाले, 'आम्हाला अभिमान आहे, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. पण तुम्ही मग बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी आहात का? असा खोचक सवाल ठाकरेंना उत्तर देताना केला आहे.

शिवसैनिकांवर विश्वास नाही?

आज पार पडलेल्या गटप्रमुख मेळाव्यादरम्यान शिवसैनिकांकडून प्रतिज्ञा पत्र लिहून घेण्यात आले होते. या प्रतिज्ञा पत्रावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसैनिकांवर विश्वास नाही. म्हणून अशाप्रकारे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतल्याचे ते म्हणाले. असा आरोप बोलताना शिंदेंनी केला.

त्यांचा हिशोब माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहित

शिवसेनेकडून वारंवार होणाऱ्या खोके शब्दाच्या उल्लेखावर बोलताना शिंदे म्हणाले की, ते आम्हाला मिंदे गट म्हणाले, आम्ही बाळासाहेबांचे खंद्दे आहोत. आम्ही तुम्हाला तिन महिन्या आधीच आसमान दाखवलं आहे. ते आम्हाला खोके सरकार म्हणत आहेत. मात्र त्यांचा हिशोब माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहित आहेत. वेळ आल्यावर सर्व सांगेल, असा इशाराही त्यांनी ठाकरेंना दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Government Websites : सरकारी संकेतस्थळे आता मराठीत होणार

E Bike Taxi : राज्यात ई-बाईक टॅक्सी सुरू होणार; पहिल्या 1.5 किमीसाठी 15 रूपये भाडं

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Accident : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात अपघात