राजकारण

मोदी सरकारसारनंतर आता शिंदे सरकारही राबवणार पेन्शन योजना; शिंदे सरकारचे ‘हे’ मोठे निर्णय एकदा पहाच

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते.

Published by : shweta walge

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (यूपीए) लागू करण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या निवृत्तिवेतन योजनेची अंमलबजावणी मार्च २०२४ पासून करण्यात येणार असून राज्य सरकारच्या सेवेतील सुमारे अठरा लाखांहून जास्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्विकारावी हे समितीच्या शिफारशीतले तत्व मान्य करुन राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या ५०% इतके निवृत्तिवेतन आणि त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्तिवेतनाच्या ६०% इतके कुटुंब निवृत्तिवेतन आणि त्यावरील महागाई वाढ मिळेल. तसेच अनेक निर्णयही घेतले आहेत.

राज्य सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय

१) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. मार्च २०२४ पासून अंमलबावणी. लाखो कर्मचाऱ्यांना फायदा

२) राज्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली

३) गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ

४) ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार

५) थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी

६) पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार. पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार

७) नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प. ७ हजार १५ कोटीस मान्यता. नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा

८) सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी

९) शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत

१०) ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ. सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ

११) ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी #महाप्रित ५ हजार कोटी निधी उभारणार

१२) ‘बार्टी’ च्या ‘त्या’ ७६३ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ

१३) मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार. विविध महामंडळे प्रकल्प राबविणार

१४) कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ

१५) कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ

१६) चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल

१७ श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना

१८) पाचोऱ्यातील सहकारी सूत गिरणीस शासन अर्थसहाय्य

१९) सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

IAF Plane Crash : राजस्थानात वायुसेनेचे विमान कोसळले; दोन्ही वैमानिकांनी गमावला जीव

Pakistani Actress Death : भयंकर! दोन आठवड्यांपूर्वी मृत्यू, सडलेल्या अवस्थेतील मृतदेह; पाकिस्तानी अभिनेत्रींच्या गूढ मृत्यूची चौकशी होणार

Latest Marathi News Update live : निकेत कौशिक मिरा भाईंदरचे नवे पोलीस आयुक्त

Pune Crime News : प्रेयसीला रबडीतून दिली गर्भपाताची गोळी, पुण्याच्या हिंजवडीतील धक्कादायक प्रकार