राजकारण

हंगामी अध्यक्ष नेमून झिरवळांवर अविश्वास प्रस्ताव पारित होणार?

सत्ता स्थापनेच्या दिशेने पावले? प्रोटेम स्पीकर नियुक्त करुन विधानसभेत संख्याबळ परीक्षण करण्याची शक्यता

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : एकनाथ शिंदे गटाने ठाकरे सरकार विरोधात आता कंबर कसली असून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आपल्या गटाचे नाव ठरवल्यानंतर आता विधानसभेत प्रोटेम स्पीकर नियुक्त होण्याची शक्यता आहे. यानंतरच फ्लोर टेस्ट करण्याची मागणी केली जाऊ शकते. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

एकनाथ शिंदे गटाविरोधात शिवसेनाही आक्रमक झाली असून एकनाथ शिंदेंसह 15 आमदारांना निलंबित करण्याबाबत नोटीस काढणार आहे. यासंबंधीची मागणीही शिवेसेनेने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनीही खेळी करण्यास सुरुवात केली असून लवकरच उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. हा प्रस्ताव पारित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. लवकरच विधानसभेत प्रोटेम स्पीकर नियुक्त होऊ शकतो. यानंतर विधानसभेत संख्याबळ परीक्षण करण्याची तयारी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

कोण असतो प्रोटेम स्पीकर?

प्रोटेम स्पीकर हंगामी उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहतात. त्यांचं कामाचं स्वरुप हंगामी असतं. विधानसभेत प्रोटेम स्‍पीकरची नेमणूक राज्यपाल करतात. प्रोटेम स्पीकर हेच नवनियुक्त विधीमंडळ सदस्यांना (आमदार) शपथ देतात. त्यांच्याच देखरेखीखाली आमदारकीच्या शपथीची प्रक्रिया पूर्ण होते. जोपर्यंत आमदारांना शपथ दिली जात नाही, तोपर्यंत त्यांना विधीमंडळांचा सदस्य मानले जात नाही. म्हणूनच सर्वात आधी आमदारांना शपथ दिली जाते. हंगामी अध्यक्ष निवडताना संख्याबळानं मोठ्या पक्षाचा काहीही संबंध नसतो. जो जास्त काळ सभागृहाचा सदस्य राहिलेला आहे. त्याला राज्यपाल हंगामी अध्यक्ष करू शकतात.

दरम्यान, गुवाहाटीतील बंडखोर आमदारांची आज बैठक होणार असून पुढील रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी शिंदे गट नावाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे लवकरच एकनाथ शिंदे राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर, भाजपही आता सक्रिय झाली असून भारतीय जनता पार्टीची कोअर कमिटीची बैठक सकाळी 11 वाजता होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी