राजकारण

शिवसेनेचे डॅमेज कंट्रोल: मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक एकनाथ शिंदेंची भेट घेऊन मुंबईला रवाना

Maharashtra Government, MVA Politics, Eknath Shinde, MLA, Vidhan Parishad Election Result, BJP news in Marathi: शिवसेनेतील डॅमेज कंट्रोलची तयारी करण्यात आली असून शिंदे यांच्यांशी चर्चा करण्यासाठी मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक हे सुरतला गेले होते.

Published by : Team Lokshahi

विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. या निकालानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोन कालपासून नॉट रिचेबल आहे. त्यांच्यांसोबत 35 आमदारांचा गट असल्याच्या बातम्या येत आहे. यामुळे शिवसेना पक्ष प्रमुखांनी कठोर भूमिका घेत एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरुन हाकालपट्टी केली तर अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. दुसरीकडे शिवसेनेतील डॅमेज कंट्रोलची तयारी करण्यात आली असून शिंदे यांच्यांशी चर्चा करण्यासाठी मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक हे सुरतमध्ये दाखल झाले. अर्धा तास तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर ते नार्वेकर, फाटक मुंबईकडे रवाना झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि आमदार रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांच्यावर शिंदे यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी सोपवली आहे. हे दोन्ही नेते सुरतला रवाना झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्यासाठी त्यांच्याकडे निरोप दिला आहे. हा निरोप नेमका काय आहे, शिंदे माघार घेणार का, अशा अनेक चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

शिंदे दिल्लीला जाणार

शिंदे हे शिवसेनेच्या विरोधात बंडाच्या तयारीत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही टेन्शन नाही. ते रिलॅक्स मुडमध्ये सुरतमधील 'ली मेरेडियन' या हॉटेलमध्ये पुढचे निर्णय घेत आहेत. आता शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक पोहचण्यापुर्वीच ते दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शिवसेनेतील डॅमेज कंट्रोल अपुर्ण राहील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश