राजकारण

मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की...

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान; राजभवनात घेतली शपथ

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिंदेंचा शपथविधीही आजच पार पडला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. दरम्यान, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री असणार आहेत.

एकनाथ शिंदे यांनी हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेऊन सुरुवात केली. व मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची राजभवनात शपथ घेतली. यानंतर, एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है, बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, धर्मवीर आनंद दिघे यांचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी नावाचा जयघोषानं सभागृह दणाणले आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

कोण आहेत एकनाथ शिंदे

1997 व 2002 दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे.

2004, 2009,2014,2019 चार वेळा आमदार.

2014 ते 2019 विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते.

12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 विधानसभा विरोधी पक्ष नेता.

5 डिसेंबर ते नोव्हेंबर 2019 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री. तसेच जानेवारी 2019 सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री.

ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; डिसेंबर 2019 पासून शिवसेनेचे गटनेते.

नोव्हेंबर 2019 पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री.

आणि आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात