राजकारण

Eknath Shinde : औरंगाबाद नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला

एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर

Published by : Team Lokshahi

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी काही ठिकाणचे पंचनामे 2-3 दिवसांत पूर्ण होतील. शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेऊ, अशी घोषणा केली आहे. शासनासाठी प्रत्येक शेतकऱ्याचा जीव मोलाचा असून आत्महत्या कमी करणे हे शासनाचे उद्दीष्ट आहे. यासाठी योजना तयार करणार असल्याची माहितीही शिंदेंनी दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, काही ठिकाणचे पंचनामे 2-3 दिवसांत पूर्ण होतील. शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेऊ. जिल्ह्यात पाण्याचा मुख्य प्रश्न आहे. याबाबत संभाजीनगरची जुनी योजना 700 मीटर जलवाहिनी बदलण्याची मागणी होती. याबाबत चर्चा झाली असून 200 कोटींची आवश्यकता लागेल. ही योजना कार्यन्वित झाल्यास एक दिवसाआड पाणी मिळेल. तसेच, 70 एमएलडी पाणी उपलब्ध होईल. तर, संभाजीनगर येथे क्रिडा विद्यापीठ स्थापन करणार असून यासाठी 200 कोटी रुपयांचा देणार आहे. तसेच, केंद्राकडे औरंगाबाद शहराचे नावाचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

मराठवाड्यात आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत. यासाठी मदतीची घोषणा केली जाईल. पण, आत्महत्या होऊ नये यासाठी एक प्रीव्हेशन अ‍ॅक्ट तयार केला पाहिजे. याबाबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी सूचना दिल्या आहेत. बॅंकानेही तातडीने कर्ज द्यायला पाहिजे, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, बॅंक यांच्यात बैठक घेण्याच्या सूचना केल्या आहेत. शासनासाठी प्रत्येक शेतकऱ्याचा जीव मोलाचा आहे. आत्महत्या कमी करणे हे शासनाचे उद्दीष्ट आहे. यासाठी शॉर्ट आणि मिड टर्म योजना तयार करणार आहेत.

वेरुळ घृष्णेश्वर लेण्यांची विकासाची मागणी करण्यात येत आहे. यानुसार चर्चा झाली आहे. नांदेड शहराच्या रस्त्यांचे प्रस्ताव पाठवले आहेत. त्याच्या अडचणी दुर करुन निर्णय घेण्याच्या सूचना नगर विकास विभागाला करण्यात आल्या आहेत. परभणीतील समांतर पाणीपुरवठा योजना कार्यन्वित होईल.

नांदेड-जालना समृध्दी महामार्ग करण्यात येईल. भूमीगत गटार योजना मंजूर होतील. औंढा-नागनाथ विकास निधी देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.

लातूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी मोफत जमीनीची मागणी करण्यात आली होती. यासंबंधीच्या अडचणी दुर करण्यात येऊन निर्णय होईल. घाटी रुग्णालयाचे खाजगीकरण होऊ नये, अशी मागणी होत होती. त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे.

पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यानात पीपीई मॉडेल अयशस्वी ठकत आहे. यामुळे आता शासनाच्या निधीने वेगळे मॉडेल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा आढावा घेतलेला आहे. त्याला युध्दपातळीवर चालना देऊन काम पुर्ण करु. तसेच, मुंडे साहेबांच्या स्मारकांचीही मागणी करण्यात आली असून त्यालाही चालना देऊ, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांगलीच्या वेटलिफ्टर संकेत महादेव सरगरला रौप्यपदक मिळाले आहे. त्यांचे एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले असून शासनाच्या माधयमातून संकेत सरगरला 30 लाख रुपये व प्रशिक्षकांला 7 लाख रुपये पारितोषिक देणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा