Sharad Pawar | eknath shind  team lokshahi
राजकारण

'जर राष्ट्रपती राजवट आली तर भाजपने एवढं केलं त्याचा काय फायदा'

उद्धव ठाकरे यांच्याशिवाय दुसरे मुख्यमंत्री महाविकास आघाडीला चालतील का?, शरद पवारांनी सांगितली भूमिका

Published by : Shubham Tate

sharad pawar on eknath shind : एकनाथ शिंदेच्या गटात आता आणखी एक नाव सामील झाले आहे. शिवसेनेच्या उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत हेही नॉट रिचेबल असल्याचे समजत आहे. यामुळे सामतांनीही बंडखोरी केल्याची चर्चा आहे. यामुळे शिंदे गटाचे बळ आता वाढणार आहे. तर दुसरीकडे विलीनीकरण हा पर्यया शिंदे (eknath shinde) गटासमोर उपलब्ध आहे. आधीच्या कायद्यात गट बनवणे शक्य होतं. मात्र आत्ताच्या कायद्यात हे शक्य नाही. हे निलंबनापासून विलीनीकरणाशिवाय वाचू शकत नाहीत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सरकार टिकवण्यासाठी मोठे शर्तींचे प्रयत्न करताना दिसत आहेत. (eknath shinde rebel shivsena uddhav thackeray sharad pawar)

अशातच महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी दिल्लीतून पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ही गोष्ट खरी आहे की एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या लोकांनी नव्या युतीबाबत चर्चा केली आहे. मात्र आमच्या मित्रपक्षाचे नेते आम्हाला भेटले होते. या सरकारला आमचं पूर्ण पाठबळ असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. आमचा त्यांना पाठिंबा आहे. आम्हाला ही तोच कायम ठेवायचा आहे. अस मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनाचा एक गट आसामला गेला आहे. त्यांच्या बोलण्यातून समजतंय की त्यांना सत्ता परिवर्तन हवं आहे. शिवसेनेला हा विश्वास आहे की गेलेले लोक परत आल्यावर त्यांच्या भूमिकेत बदल होईल. त्यामुळे आमचा पूर्ण पाठिंबा शिवसेनेला आहे.

बंडखोरांनी गुजरात आणि आसाम राज्य निवडलं आहे. शिंदे यांच्याकडे संख्याबळ आहे, तर मग ते गुहावाटीला जाऊन का बसले आहेत, मुंबईत का येत नाहीत?, असा सवाल शरद पवार यांनी केला आहे. तसेच दोन्ही राज्ये भाजपच्या ताब्यात आहेत. शिंदे काल म्हणाले, पॉवरफुल्ल शक्तीचा आपल्याला पाठिंबा आहे. मग ती पॉवरफुल्ल शक्ती नक्की कोण?, हे मी सांगण्याची गरज नाही, अस म्हणत त्यांनी भाजप यात सामील असल्याचे वक्तव्य केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज