Eknath Shinde and Uddhav Thackeray  Team Lokshahi
राजकारण

शिंदेच्या टि्वटमुळे टि्वस्ट : शिवसेना कोणाची? शिंदेची की उद्धव ठाकरेंची?

Maharashtra Crisis : शिंदे यांनी त्यावर टि्वट करत आपलीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा करणारे पाऊल उचलले आहे.

Published by : Team Lokshahi

Maharashtra Crisis : आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेना कोणाची यावरुन वाद होण्याची चिन्ह आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या टि्वटमुळे हा वाद होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी घेतलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश शिवसेनेचे गटनेत्यांकडून काढण्यात आले होते. आता शिंदे यांनी त्यावर टि्वट करत आपलीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा करणारे पाऊल उचलले आहे.

शिवसेनेने आमदारांच्या बंडखोरीनंतर कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यावर संध्याकाळी बैठक होत असून यावेळी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बैठकीला उपस्थित न राहिल्यास कारवाई करणार असल्याचा कडक इशाराच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना देण्यात आला आहे.

शिंदे यांना गटनेते पदावरून हटवल्यानंतर आज शिवसेनेकडून आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे.

काय आहेत शिंदे यांचे टि्वट

शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.

किती आमदार हवेत

55 आमदार असलेल्या शिवसेनेतू बाहेर पडण्यासाठी शिंदे यांना 35 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणे आवश्यक आहे. परंतु शिंदे यांच्याकडे 46 आमदार असल्याचा दावा करत आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यांकडे केवळ 9 आमदार राहिले आहेत. यामुळे आता खरी शिवसेना कोणाची यावर कायद्याचा किस पडणार आहे. उद्धव ठाकरेपेक्षा जास्त आमदार शिंदे यांच्याकडे आहेत. त्यामुळे आपलीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचा ते दावा करतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर