राजकारण

नितीन देशमुखांच्या 'त्या' आरोपांवर शिंदे गटाचा खुलासा; फोटोही केले प्रसिध्द

एकनाथ शिंदे यांच्या 40 आमदारांमधील एक आमदार बुधवारी स्वगृही परतला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या 40 आमदारांमधील एक आमदार बुधवारी स्वगृही परतला आहे. अकोलाचे शिवसेना आमदार नितीन देशमुख नागपुरात परतले असून त्यांनी माझा घातपात करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला आहे. यावर आता शिंदे गटाने आम्हीच त्यांना पाठविल्याचा खुलासा केला आहे. यासोबत काही फोटोही प्रकाशित केले आहेत.

सुरत पोलिसांनी जबरदस्तीने मला ठेवले होते. माझी प्रकृती बिघडली नसतानाही दवखान्यात 200 पोलिसांनी जबरदस्तीने नेले. यामागे त्यांचा हेतू नेमका काय होता माहित नाही, तिथे हॉस्पिटलमध्ये वीस-पंचवीस लोकांनी मला जबरदस्तीने इंजेक्शन दिले, ते इंजेक्शन कोणते ते मला माहिती नाही. माझा घातापात करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप नितीन देशमुख यांनी केला होता.

तर यावर शिंदे समर्थकांनी नितीन देशमुख पळून गेले नाही. तर आम्हीच त्यांना चार्टर्ड विमानाने पाठविल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावेळी शिंदे गटांनी नितीन देशमुखांचे फोटोही प्रसिध्द केले आहेत. यामुळे आता नितीन देशमुख काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे अपक्ष मिळून ४२ आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ १८ आमदार असल्याचं समजत आहे. याचदरम्यान एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केलं आहे. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये त्यांनी 42 आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केले आहे. तर, शिंदे 50 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र संध्याकाळपर्यंत राज्यपालांना देतील, असे मानले जात होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kanpur Crime : 'आय लव्ह मोहम्मद' घोषणेवरून वाद; कानपूरमध्ये FIR, बरेलीत फतवा

Raj Thackeray : महापालिका निवडणुकीसाठी मनसेची रणनिती निश्चित, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या थेट सूचना

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची 'दशावतार' चित्रपटाला प्रशंसा, कोकणाची व्यथा महाराष्ट्राच्या मनात

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, 'अशा विधानांना पाठिंबा...'