राजकारण

कंटेनर भरून खोके कुणी पचवले, हे समोर येईलच; शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जे काही करतो ते खुलेआम करतो. लपूनछपून करत नाही. मोठे मोठे खोके, फ्रीजपेक्षा कंटेनर भरून खोके कुणाकडे जाऊ शकते, ते कोण पचवू शकतो हे सर्वांना माहिती आहे. एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, मी जे करतो, ते खुलेआम करतो. लपून-छपून करत नाही. काही लोक लपून-छपून करतात. पण अशी कामं उजेडात येतात. ती लोकांना माहिती होतात. काल दीपक केसरकरांनी एक विधान केलं आहे. ते बोध घेण्यासारखं आहे. त्यामुळे इतरांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:कडे पाहावं. हे बोलणं कुणाला लागू पडतंय ते बघावं. फ्रीजमध्ये भरून कुठे खोके गेले असं केसरकर म्हणाले आहेत. मी त्याचा आता शोध घेतो आणि नंतर त्यावर बोलतो. खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का. मोठे मोठे खोके, फ्रीजपेक्षा कंटेनर भरून खोके कुणाकडे जाऊ शकते, ते कोण पचवू शकतो हे सर्वांना माहिती आहे. एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.

महाराष्ट्रात यापूर्वी एक नकारात्मकता होती. आता आम्ही सरकार बनवल्यानंतर एक सकारात्मकता तयार झाली आहे. आमच्या सरकारबद्दल लोकांची मत चांगली आहेत. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या छातीत धडकी भरली आहे. त्यांना धक्क्यावर धक्के बसतायत. त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होत आहेत, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

सत्ता संघर्षाच्या काळात सलग 11 दिवस गुवाहाटीमध्ये होतो. तेव्हा सगळ्यांच्या मनावर दडपण होतं. आता हे दडपण दूर झाले असून तेव्हा ज्या कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. त्याच कामाख्या देवीचे आज मुख्यमंत्री बनून पुन्हा दर्शन घेताना एक वेगळंच समाधान मिळालं. या केलेल्या मदतीतून उतराई होणं शक्य नसले तरीही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात नवी मुंबईमध्ये आसाम भवन बांधायला शिंदे यांनी होकार दिला, तर आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आसाम सरकारने जागा देण्यास तयार असल्याचे आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी जाहीर केले, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा