राजकारण

खिसे कापणारे व नंतर किराणा वाटणारे...किराणा वाटपावर बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यांवर प्रहार

खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे काही कमी नाही आहेत.तसेच महाठग आणि महा औलाद कमी आहे का?

Published by : Sagar Pradhan

अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात बोलत असताना शिंदे गटाचे आमदार व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांवर निशाणा साधला आहे. दिवाळी निमित्त अमरावती खासदार नवनीत राणा आणि रवी राणा हे गोरगरीब लोकांना किराणा वाटप करत आहे. यावरूनच राणा यांच्यावर खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे काही कमी नाही, अशी नाव न घेता बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे.

अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात माजी मंत्री बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली होती, या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू टीका केली आहे. अमरावतीत दिवाळी निमित्त खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे दाम्पत्य घरोघरी मोफत किराणा वाटत आहे, यावर बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचं नाव न घेता टीका केली, खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे काही कमी नाही आहेत.तसेच महाठग आणि महा औलाद कमी आहे का? इथून खिसे कापायचे, गोरगरिबांच्या खिशात हात घालायच, लोकशाहीचे पतन करायचं व राजकारणाची ऐसी की तैशी करायची अशी बोचरी टीका त्यांनी राणा दाम्पत्यावर केली.

अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक गरीब कुटुंबात दिवाळी उत्साहात साजरी व्हावी या उद्देशाने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही एक लाख कुटुंबांमध्ये किराण्याचे वितरण केले जाणार आहे. उद्यापासून अमरावती शहरासह जिल्ह्यातील विविध भागात गरिबांच्या घरी युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते हा किराणा पोहोचवणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा