राजकारण

पुण्यात इलेक्ट्रॅानिक्स दुकानात झालेल्या स्फोटाचा थेट ATS कडून तपास; असं काय घडलं?

स्फोटांत झालेलं नुकसान पाहता तपास यंत्रणांना संशय आल्याने एटीएसचा तपास सुरू केल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : पुण्यात सहकारनगरमध्ये इलेक्ट्रॅानिक्स दुकानात झालेल्या स्फोटांचा तपास एटीएसने सुरू केला आहे. शनिवारी रात्री हा स्फोट झाला होता. यामध्ये दोन जण जखमीही झाले असून उपचाराकरीता त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, स्फोटांत झालेलं नुकसान पाहता तपास यंत्रणांना संशय आल्याने एटीएसने तपास सुरू केल्याची माहिती मिळत आहे.

माहितीनुसार, सहकारनगरमधील शनिवारी रात्री इलेक्ट्रॅानिक्स दुकानात एका टीव्हीचा स्फोट झाला. परंतु, हा स्फोट इतका भीषण होता की दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा व इतर साहित्य उडून पलीकडील रस्त्यावर पडले होते. याठिकाणी आग लागून स्फोट झाल्याने दोन मजली इमारतीत मोठी पडझड झाली आहे. तर, एक दुचाकी पूर्ण जळाली आहे.

याशिवाय घटनास्थळावरील तीन दुकानांध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या भीषण आगीत दोन नागरिक जखमी झाले असून यामध्ये एक इसम दुकानाचा मालक असल्याचे समजते. या स्फोटांच्या तीव्रतेमुळे तपास यंत्रणांना संशय आल्याने एटीएसने तपास सुरु केला आहे. दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा