Ramraje Naik Nimbalkar and Rahul narvekar Team Lokshahi
राजकारण

विधिमंडळात आता प्रथमच सभापती सासरे तर अध्यक्ष जावाई

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विधान परिषदेत सासरे सभापती, तर विधानसभेत अध्यक्ष जावई असा प्रकार झाला.

Published by : Team Lokshahi

Maharashtra assembly speaker election : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात झाला. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी उमेदवारी आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी व्हिप जारी केले आहे. परंतु शिंदे गटाने शिवसेनाचा व्हिप झुगारला. यामुळे राहुल नार्वेकर यांचा विजय झाला. राहुल नार्वेकर यांना राज ठाकरे यांच्या मनसेची साथ मिळाली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विधान परिषदेत सासरे सभापती, तर विधानसभेत अध्यक्ष जावई असा प्रकार झाला. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पु.ल. देशपांडे काय म्हणतात, हे सांगत कोटी केली. राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. आता नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष झाले.

अभिनंदन ठरावात बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विधान परिषदेत सासरे सभापती, तर विधानसभेत अध्यक्ष जावई झाले आहे. पु.ल.देशपांडे म्हणतात, की जावाई म्हणजे सासरे यांच्या पत्रिकेतील दशंम ग्रह आहे. परंतु आपल्याबाबत तसे काही नाही.

सासरे विधान परिषदेचे सभापती

नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. नार्वेकर यांच्या विजयी झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच सासरे आणि जावई यांची जोडी महाराष्ट्राच्या विधिमंडळात आता दिसणार आहे. रामराजे निंबाळकर सातारा जिल्ह्यातील निंबाळकर हे फलटणच्या निंबाळकर घराण्याचे 29 वे वंशज आहेत. ते 1995 साली सर्वप्रथम फलटण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी निंबाळकरांनी 22 अपक्षांना एकत्र करत तत्कालीन शिवसेना-भाजपा युती सरकारला पाठिंबा दिला होता. युती सरकारच्या त्या राजवटीमध्ये निंबाळकर हे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष होते.

1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर निंबाळकर यांनी त्या पक्षात प्रवेश केला. विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये आधी राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्रिपद त्यांनी सांभाळले. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्य नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 2010 साली सर्वप्रथम विधान परिषदेवर संधी दिली. सध्य ते विधान परिषदेचे सभापती आहेत.

राहुल नार्वेकर सर्वात तरुण अध्यक्ष

राहुल नार्वेकर हे ४५ वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यास ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. राहुल नार्वेकर हे एकेकाळचे शिवसेनेचेच खंदे नेते होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधान परिषदेत होते. आता ते भाजपचे आमदार आहेत. राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...