राजकारण

Sangita Thombare : भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक; ठोंबरेसह चालक जखमी

बीडच्या केज विधानसभेच्या माजी आमदार संगीता ठोंबरे या केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली गावच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे.

Published by : Dhanshree Shintre

बीडच्या केज विधानसभेच्या माजी आमदार संगीता ठोंबरे या केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली गावच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दहिफळ वडगाव येथ त्या गेल्या होत्या. अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून कार्यकर्त्याच्या घरी चहापाण्यासाठी जात असताना विजय उत्तमराव गदळे यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.

यात गाडीचा ड्रायव्हरच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागला. त्या नंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांना लागून त्याही जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संगीता ठोंबरे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार सुरू आहेत. हा हल्ला नेमका का करण्यात आला? याचा तपास पोलीस करत आहेत. या संदर्भात केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून हल्लेखोराचा पोलीस शोध घेत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल

Ajit Doval : 'तुमच्याकडे भारतात झालेल्या नुकसानीचा एकतरी फोटो आहे का?'; अजित डोवाल यांचे विदेशी माध्यमांना खुले आव्हान

Latest Marathi News Update live : विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकावरून गदारोळ

KL Rahul : कर्णधार आणि उपकर्णधार अनुपस्थितीत केएल राहुलकडे टीम इंडियाची धुरा