राजकारण

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश; मोहित कंबोज यांचं ट्विट, म्हणाले...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ऑगस्ट महिन्यात त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडत मुंबई उपनगरातील वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे घोषित केले होते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्या उपस्थितीत संजय पांडे यांनी पक्षप्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपासून संजय पांडे यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सुरु होती आणि आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मोहित कंबोज यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. मोहित कंबोज यांचा ट्विट करत संजय पांडेंना इशारा दिला आहे.

मोहित कंबोज ट्विट करत म्हणाले की, Pandey ji 2022 का हिसाब लगता है बाक़ी है 2024 में ख़त्म करते हैं ! असे म्हणत मोहित कंबोज यांनी ट्विट केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला,म्हणाले...

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस; डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करुन दिल्या शुभेच्छा

Latest Marathi News Update live : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

Kolhapur Ambabai Mandir : अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन आज बंद राहणार