राजकारण

'बाळासाहेबांनी दिलेली वचनं पाळणं हे शिवसेनेच्या हिंदुत्वात बसत नाही का?'

Gajanan Kale यांचा शिवसेनेला सवाल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बुधवारी अयोध्या दौरा (Ayodhya Tour) केला. आज आमची तीर्थयात्रा आहे, राजकीय यात्रा नाही. जनतेला दिलेलं वचन पाळणं हेच आमचं हिंदुत्व आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यावरुन आता मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

गजानान काळे म्हणाले की, जनतेला दिलेली वचनं पाळणं हेच शिवसेनेच हिंदुत्व. छोटे नवाब. मग औंरंगाबादचे संभाजीनगर कधी करताय? मशिदीवरचे भोंगे कधी उतरणार आणि रस्त्यावरचा नमाज कधी बंद होणार? आदरणीय बाळासाहेबांनी जनतेला दिलेली वचनं पाळणं हे शिवसेनेच्या हिंदुत्वात बसत नाही का, असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे.

दरम्यान, अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यांच्या सोयी-सुविधेसाठी येथे एक महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 100-200 खोल्यांचं महाराष्ट्र सदन होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार आहेत. यासंबंधी योगी सरकारशी पत्रव्यवहार देखील करणार आहेत, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा