Aurangabad Jain Temple  Team Lokshahi
राजकारण

कचनेर येथील जैन मंदिरातून चोरी झालेल्या सोन्याच्या मूर्तीचा 24 तासात लावला छडा

मुद्देमालासह आरोपी जेरबंद; पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांची माहिती

Published by : Sagar Pradhan

सचिन बडे|औरंगाबाद: शहरातील कचनेर येथील प्रसिद्ध असलेल्या जैन मंदिरातून दोन किलो वजनाची एक सोन्याची मूर्ती चोरी झाली होती, मंदिरातील मूर्तीचा रंग फिकट पडल्याचं लक्षात आल्यानंतर मूर्ती बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने पोलिसांनी जलद गतीने तपास करून या प्रकरणात पोलिस अधीक्षक मनीष कलवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलिसाची पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी 1) अर्पित नरेंद्र जैन वय 32 वर्ष राहणार शिवपुरी तहसील शिवपुरी जिल्हा गुना मध्यप्रदेश, 2) अनिल भवानी दिन विश्वकर्मा वय 27 वर्षे राहणार शहागड तालुका शहागड जिल्हा सागर मध्यप्रदेश या दोन आरोपींना मुद्देमाला सही अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 94 लाख 87 हजार 797 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अशी माहिती अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सदरील माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे, दोन्ही आरोपींना अटक करून पुढील कारवाईसाठी चिकलठाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, आदी सह सहकाऱ्यांनी कामगिरी केली आहे अशी माहिती आज रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सदरील माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."