राजकारण

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका; म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर होते.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना जामखेड येथे काही मुस्लिम बांधवांनी त्यांचा सत्कार केला मात्र यावेळी मुस्लिम बांधवांनी आम्हाला अहिल्यानगर नको तर अहमदनगरच पाहिजेल अशा घोषणाही दिला. संपूर्ण नगर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने अहिल्यानगर नावाला विरोध केला आहे.

याच पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले की, एवढे नेते पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरला आले असतील, एवढे कार्यक्रम झाले.

किंवा तिकडे संभाजीनगरला आले असतील. इकडे सगळीकडे राज्यभराचा विषय आहे ना. तिथे कुणीही मागणी केली नाही. आज शरद पवार गेल्यानंतरच ते खऱ्या औरंग्याची पिल्लं का अशी मागणी करत आहेत?

शरद पवार म्हणजे हा मिनी औरंगजेब आहे आणि त्या खऱ्या औरंग्याच्या पिल्लावळीला यामध्ये औरंगजेबाचे काही गुण दिसत असतील म्हणून त्यांनी तिथे घोषणा केली असेल कारण धनगरांचे वाटोळं करायचं म्हटलं तर भारतातल्या शेंबड्या पोराला पण माहित आहे याला परफेक्ट सोल्युशन काय शरद पवार. असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?