राजकारण

दादांना कोणी गद्दार बोलत नाही किती दहशत; गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी

इंडिया आघाडीची बैठक पार पडत असतानाच दुसरीकडे महायुतीची देखील शिंदे-फडणवीस-पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : इंडिया आघाडीची बैठक पार पडत असतानाच दुसरीकडे महायुतीची देखील शिंदे-फडणवीस-पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. यामुळे सबागृहात एकच हशा पिकला होता.

गुलाबराव पाटील म्हणाले की, पहिलं आमचं तिघांचं लव्ह मॅरेज झालं होतं. पण, वेगळे झालो. देवेंद्र भाऊंनी गाडीत घेतलं मग दादा जोडले गेले. दादा आल्याने गद्दार बोलण्याचं बंद झालं. दादांना कोणी गद्दार बोलत नाही किती दहशत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

लोकसभेला 2024 ला आम्ही ताकद लावू. पण, आमच्या वेळी थोडी गडबड होते आमदारकीच्या वेळी गडबड नको. भाजप सोबत नेहमी होतो, राष्ट्रवादीच्या विरोधात नेहमी लढलो. आता घड्याळ्याने सांभाळून घ्यावं, अशी विनंती त्यांनी केली.

ममता ताई उठून गेल्या म्हणे. पवार साहेब थांब म्हणत होते. भाऊबीजचा दिवस आहे. इंडियाचं पुढे काय होणार यातून कळतं, असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा