राजकारण

‘नाक खाजे नकटी खिजे’ शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचा एकनाथ खडसेंना टोला

Published by : Vikrant Shinde

जळगाव: शिवसेना नेते गुलाबराव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाक्युद्ध चांगलेच रंगलेले पाहायला मिळत आहे.

नगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी माझ्या जिल्ह्यात एकनाथ खडसे सारखा डाकू असल्याचे वक्तव्य केले होते यावर एकनाथ खडसे यांनी 'चोरो को सारे नजर आते हैं चोर ' असा पलटवार गुलाबराव पाटील यांच्यावर केला होता दरम्यान गुलाबराव पाटील यांनी खडसेंच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी फक्त पद मिळवली मात्र खान्देशचा विकास गेला कुठे ? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला असून मी मुख्यमंत्री झालो नाही येवढेच जनतेसमोर बोंबलायचा आणि दोन पोलीस गाड्या मागे पुढे फिरवून स्वतःला मिरवायचा असा अशी टीका करत खडासेंवर पलटवार केला आहे

तसेच डाकू म्हणण्याची आपल्याकडे भाषा आहे त्यानुसार मी खडसे – महाजन सारखे डाकू माझा जिल्ह्यात असल्याचे मी बोललो होतो मात्र 'नाक खाजे नकटी खिजे' असा टोला गुलाबराव पाटील यांनी खडसेंना लगावला आहे .

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा