राजकारण

भारताने रचला इतिहास; पहिले खासगी रॉकेट विक्रम-एसचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आणि हैदराबादस्थित कंपनी स्कायरूटने अवकाश खासगी क्षेत्रात इतिहास रचला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आणि हैदराबादस्थित कंपनी स्कायरूटने अवकाश खासगी क्षेत्रात इतिहास रचला आहे. देशातील पहिले खाजगी क्षेत्रातील मिशन प्रक्षेपण यशस्वी झाले आहे. स्कायरूट एरोस्पेसने बनवलेल्या विक्रम एस रॉकेटद्वारे ही मोहीम प्रक्षेपित करण्यात आली. निर्धारित लक्ष्यानुसार, हे रॉकेट अवकाशात १०० किलोमीटर प्रवास करेल आणि त्यानंतर ते समुद्रात कोसळणार आहे. आंध्रप्रदेशातल्या श्रीहरीकोटा येथून आज 11.30 वाजता विक्रम सबऑर्बिटल यशस्वी झेप घेतली.

इस्रो आत्तापर्यंत आपले रॉकेट प्रक्षेपित करत होते. परंतु, इस्रोने पहिल्यांदाच आपल्या लॉन्चिंग पॅडवरून खाजगी कंपनीचे मिशन विक्रम एस रॉकेट प्रक्षेपित केले आहे. या मोहिमेसह, हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेसने अंतराळात रॉकेट सोडणारी पहिली खाजगी अंतराळ कंपनी बनून इतिहास रचला आहे. या मिशनमुळे खाजगी अवकाश क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. सरकारी मालकीच्या इस्रोने अनेक दशकांपासून या क्षेत्रात वर्चस्व गाजवले आहे. 2020 मध्ये केंद्र सरकारने अवकाश उद्योग खाजगी क्षेत्रासाठी खुला केल्यानंतर स्कायरूट एरोस्पेस ही भारतीय अंतराळ कार्यक्रमात पाऊल टाकणारी भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील कंपनी ठरली आहे.

तर, यापूर्वी हे 15 नोव्हेंबर रोजी लॉन्च करण्याची योजना होती. सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण केल्यानंतर विक्रम-एस 81 किमी उंचीवर पोहोचणार होते. परंतु, ते त्याहूनही उंच गेले. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आणि दिवंगत शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नावावरून या रॉकेटचे नाव ठेवण्यात आले आहे. 'प्ररंभ' नावाच्या मिशनमध्ये दोन देशी आणि एक विदेशी ग्राहक असे तीन पेलोड असतील.

विक्रम-एस सब-ऑर्बिटल फ्लाइटमध्ये चेन्नईच्या स्टार्टअप स्पेस किड्झ, आंध्र प्रदेशातील स्टार्टअप एन-स्पेस टेक आणि आर्मेनियन स्टार्टअप BazumQ स्पेस रिसर्च लॅबचे तीन पेलोड असतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Golden Temple : अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी

Latest Marathi News Update live : इगतपुरीत मनसेचं 3 दिवसीय शिबीर

Donald Trump : '50 दिवसांत युद्ध थांबवा, अन्यथा...'; डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला धमकी?

Maharashtra Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू; अद्याप विरोधी पक्षनेतेपदाची निवड नाही