राजकारण

मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचां होणार? विधानसभेत महायुतीला किती जागा येतील? अतुल सावेंनी स्पष्ट सांगितले

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

Published by : shweta walge

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 200प्लस जागा निवडुण येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महायुतीची 200प्लस जागा येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसच सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. त्यामुळे सर्वात जास्त जागा भाजपच्या येतील असं देखील ते म्हणाले आहेत.

येणाऱ्या विधानसभेला भाजपने कीती जागा लढवाव्यात असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतात. आमची कोअर कमिटी बसेल आणि सगळे मिळून ठरवतील जेवढे ज्यास्त जागा मिळतील तेवढे आम्ही लढू. देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्राचा आभ्यास खूप चांगला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारही खूप मेहनत करत आहेत. सगळ्यांच्या माध्यामातून आम्ही 200प्लस जागा निवडून आणू.

मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचां होणार यावर ते म्हणाले की, त्याचा निर्णय आमचे तिन्ही नेते मिळून करतील असं स्पष्ट म्हणाले.

विकासकामाबद्दल बोलताना ते म्हणाले की, महा ज्योती असेल किंवा परदेशी शिष्यवृत्ती असेल यासाठी आपण दरवर्षी संधी देत आहोत. अनेक वर्षांपासून ओबीसींच्या होस्टेलची मागणी होती. आता आपण 36 जिल्ह्यांमध्ये 72 होस्टेल आपण सुरू करत आहोत. या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होईल. गिरणी कामगारांच्या घरांचा विषय सुद्धा आम्ही मार्गी लावला. बरेचसे गिरणी कामगार इथून शिफ्ट झालेले आहेत. तेव्हा पुण्यामध्ये जे काही म्हाडाची गरज आहे त्यातून आम्ही देऊ अशाप्रकारे आम्ही काम करत आहोत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा